ब्रेकिंग – करमाळा येथे एटीएम वर दरोडा; लाखो रुपये घेऊन चोर पसार!

ब्रेकिंग – करमाळा येथे एटीएम वर दरोडा; लाखो रुपये घेऊन चोर पसार!

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरातील देवीचा माळ रोडवरील भवानी नाका येथे आयडीबीआय बँक असून बँकेच्या शेजारीच बँकेचे एटीएम आहे. हे ATM चोरट्यांनी फोडल्याचे आज दिसून आले. आता याबाबत करमाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृष्यानुसर आज रविवारी पहाटे पाच- साडे पाच वाजता काळ्या रंगाच्या कारमधून तोंडाला मास्क बांधून आलेल्या 4 पैकी दोघेजण बाहेर थांबले आणि दोघांनी एटीएम मध्ये प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सीसीटीव्ही प्रथमत: निकामी केला आणि कटरने एटीएम फोडून मशीनमधील 13 लाख 64 हजार रुपयांची रक्कम हातो हात लांबवली आहे.

या सदर घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.

दरोडेखोरांच्या तपासासाठी श्वान पथक आणि हातांचे ठसे तज्ञही बोलवण्यात आलेले आहे. सदर चोरटे अहमदनगर/ टेंभुर्णी/ परांडाच्या दिशेने गेले असण्याची शक्यता आहे.

तरी वरील रंगाची कार मिळून आल्यास तात्काळ करमाळा पोलीस ठाणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयडीबीआय बँकेचे कर्ज शाखा अधिकारी योगेश ढगे आणि करमाळा पोलिसांनी केले आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line