करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

अंजनडोह येथील ‘या’ तिघां विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अंजनडोह येथील ‘या’ तिघां जणांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

उमरड(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे 14 मे 2021 रोजी रात्री झालेल्या वादावरून दिलीप रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार करमाळा पोलिसांत तीन जणांविरुद्ध अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत फिर्यादी नुसार लघवी करण्याच्या कारणावरून आरोपी आणि तक्रारदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर वादात झाले. करमाळा पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी व 324 कलमांतर्गत १) राजेंद्र तुळशीराम जाधव २) गौरव सुरेश शेळके ३) सचिन शब्बीर शेळके या तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील राजेंद्र तुळशीराम जाधव याने कोयत्याने व उर्वरित दोन आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे यांनी अटक केली आहे.

हेही वाचा- करमाळा तालुक्यात आरोग्य उपकेंद्रावर लवकरात लवकर लसीकरण सुरू करा

मुलाखतीत राहुल गांधी विचारतात ‘राजनीती में आप किसे आदर्श मानते हो?’ आणि राजीव सातव उत्तर देतात, ‘शरद पवार साहब’ वाचा त्या संपूर्ण मुलाखतीची गोष्ट

 राहिलेल्या एका आरोपीलाही लवकरात लवकर अटक केली जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे यांनी सांगितले. पुढील तपास डॉ. हिरे हे करत आहेत.

litsbros

Comment here