करमाळाक्राइम

आदिनाथ सहकारी साखर कारखाना लोखंड चोरी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आदिनाथ सहकारी साखर कारखाना लोखंड चोरी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर

करमाळा- आदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव(वां)-भाळवणी ता.करमाळा येथील 13/9/22 रोजी रात्री सुमारास कारखान्यातील बैलगाडी यार्ड मधील बैलगाड्यांचे लोखंडी अक्सल चोरी प्रकरणी कारखाना सुरक्षा रक्षक अधिकारी यांनी करमाळा पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली होती.

सदर प्रकरणात तपासाअंती आरोपी राज उर्फ राजू वसंत साबळे हिंगणगाव ता. इंदापूर यांनी त्यांचेकडील चारचाकी गाडीचा वापर करून कारखान्यातील लोखंडी वस्तूंची चोरी केल्याप्रकरणी आरोपी विरोधात भा.द.वि. कलम 379 अन्वये करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

यातील आरोपीने मे.सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाचे सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने अॅड.आय. के. शेख ,बार्शी यांनी सदरील प्रकरणात केलेल्या महत्त्वपूर्ण युक्तीवादास ग्राह्य धरून मे. सत्र न्यायाधीश श्री. जे.सी. जगदाळे साहेब यांनी दिनांक 23/11/2022 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

यात आरोपीच्या वतीने ॲड.आय. के.शेख, ॲड. सागर फरतडे, ॲड.एम आर घाडगे यांनी काम पाहिले.

litsbros

Comment here