करमाळा

बारामती अँग्रोला श्री.आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर 15 वर्षे की 25 वर्षे.? संचालक मंडळात धुसफूस

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बारामती अँग्रोला श्री.आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर 15 वर्षे की 25 वर्षे.? संचालक मंडळात धुसफूस

करमाळा (सुनिल भोसले); करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला आहे. यावरून शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे आक्रमक भुमिकेत तर आदिनाथ कारखान्याचे व्हा.चेअरमन रमेश आण्णा कांबळे, व त्यांचे सहकारी संचालक यांनी आक्रमक पवित्रा घेत  विरोध केला आहे. करमाळा माढा न्यूजशी बोलताना रमेश कांबळे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने 8 सप्टेंबर 2020 रोजी शासन आदेश काढुन अडचणीतील सहकारी साखर कारखाने 5 ते 15 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा आदेश काढला आहे.

या निर्णयानुसार आदिनाथ कारखाना कमीत कमी 5 तर जास्त जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाऊ शकतो. माञ हा कारखाना बारामती ऑग्रोला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर हवा असुन हे सर्व मॅनेज करण्यासाठीच सभासदांना अंजिठा न देताच ऑनलाईन सभा घेतली असल्याचा आरोप कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनी केला आहे.

हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात शिखर बॅकेने निविधा मागवुन बारामती ऑग्रोला दिल्याचे जाहीर केले. माञ अद्यापही कारखाना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवण्यात आली आहे.

या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेवर सभासदासह काही संचालकांचा अक्षेप आहे.त्यामुळे गेली चार महिन्यांपासून आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याचा विषय अद्यापही मार्गी लागला नाही.

आदिनाथ भाडेतत्त्वावर घेत असताना कायदेशीर बाबी पुर्ण करण्यावर पवारांचा आग्रह असल्याची चर्चा आहे.माञ सर्व मॅनेज करून ही प्रक्रिया पुर्ण करून देण्यावर विद्यमान अध्यक्ष व संचालक प्रयत्नशील असल्याचेही आरोप विद्यमान काही संचालक करत आहेत.

शासन आदेशानुसार कारखाना जास्तीत जास्त 15 वर्षासाठी दिला जाऊ शकतो.माञ आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऑग्रोला वर्ष की 25 वर्षासाठी हवा असुन त्यासाठीच सर्व काही सोंग सुरू असल्याचे उपाध्यक्ष रमेश कांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा- धक्कादायक: आज पुन्हा करमाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; वाचा संपूर्ण सोलापूर जिल्हा ग्रामीणची मंगळवारची आकडेवारी

पुण्यात आढळलेली ही ‘बेवारस व्यक्ती’ आहे ‘करमाळाकर’ ओळख पटवून संपर्क करण्याचे कुटुंबीय व करमाळाकरांना आवाहन; पहा तुम्ही ओळखता का यांना.?

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आँनलाईन सर्व साधारण सभा न घेता कारखाना स्थळावर घ्यावी.

कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक शेतकरी हे जुने सभासद आहेत.त्यांना मोबाईल मधले काहीच समजत नाही. आँनलाईन त्यांना काहीच कळत नाही. त्यामुळे कारखाना स्थळावर आंतर ठेऊन सर्व साधारण सभा घ्यावी. कारखाना भाडेतत्त्वावर दयायचा कि नाही याबाबत सभासद त्याच ठिकाणी ठरवतील.काही ही करून मकाई वाचवायासाठी आदिनाथ कारखाना पवारांच्या घशात घालायचा हा बागल गटाचा डाव आहे.
पण जे काय करायचे ते सभासदांना विचारात घेऊन व्हावे, असे रमेश कांबळे म्हणाले.

अॉनलाईन मिटिंगमध्ये कारखान्याच्या आणि कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि वाहतुकदारांच्या हिताचे प्रश्न न घेतल्यास रश्मी बागल यांना आम्ही उपरोधिक उपाधी देणार आहोत.नियमांनुसार ही मिटिंग कारखाना परिसरात घेणे बंधनकारक होते. परंतु ‘हम करे सो कायदा’ राबवत सर्व सुरू आहे.
– दशरथ कांबळे,अध्यक्ष, कामगार संघर्ष समिती, करमाळा.

आम्ही वर्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली माञ परवानगी दिली नाही. त्यामुळे ऑनलाईन सभा घेण्यात येणार आहे.आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देताना शिखर बँकेने निविदा 15 वर्षांषाठी काढली ,माञ निविदा भरणा-या कारखान्यानी 25 वर्षासाठी कारखाना द्यावा अशी मागणी केल्याने शिखर बँकेने आदिनाथ कारखाना 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
धनंजय डोंगरे, अध्यक्ष, आदिनाथ सह.साखर कारखाना, शेलगांव-भाळवणी, करमाळा.

सभासदांमध्ये चर्चेला ऊत

आदिनाथ कारखान्यावर शिखर बँकेचे 128 कोटीचे कर्ज आहे.तर 100 कोटीची साखर शिल्लक आहे. त्यापैंकी 69 हजार क्विंटल साखर विकून 19 कोटी 85 लाख रूपये बँकेला चार महिन्यापुर्वी दिलेत.पैकी 80 कोटीची साखर शिल्लक आहे.आदिनाथ कारखान्या पेक्षा कित्येक पटीने जास्त कर्ज असलेले सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील एकुण 64 साखर कारखाने अडचणीत आहेत. 

माञ त्यांचा लिलाव होत नाही. आणि 30 ते 35 कोटीसाठी आदिनाथ का दिला जातोय ?याच्या पाठीमागे नेमके काय कारणे असतील अशी तालुक्यात चर्चा होताना दिसत आहे.

litsbros

Comment here