करमाळा

अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखाना होणार सुरू ; उद्या होणार बॉयलर पूजन.. कोण कोण राहणार उपस्थित? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखाना होणार सुरू ; उद्या होणार बॉयलर पूजन.. कोण कोण राहणार उपस्थित? वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील विशेषता ऊस उत्पादक शेतकऱ्याची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अखेर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्निप्रदिपादपन उद्या 11 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी माहिती दिली आज रोजी कारखाना स्थळावर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सदरची माहिती सांगण्यात आली.

या बाॅयलर अग्नि प्रदिपादनाचे पूजन ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज निंबाळकर आणि ह. भ.प. श्री. विठ्ठल महाराज पाटील, शेटफळ यांच्या शुभहस्ते व श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक अविनाश वळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते होणार असल्याचे कारखान्याच्या प्रशासनाने सांगितले.

सदरच्या बॉयलर अग्नी प्रदीपन पूजनाच्या कार्यक्रमाला एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जाणारे माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कारखान्यामधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या वर्षी होणारा गळीत हंगाम चांगल्याप्रकारे यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

उद्या होणा-या बाॅयलर अग्नि प्रदिपनसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माझी कार्यकारी संचालक हरिदास डांगे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. अरुण बागनवर यांनी केले आहे.

litsbros

Comment here