करमाळाताज्या घडामोडी

भाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ

केतूर (अभय माने) : मध्यंतरी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला सरकारी पिकांना बसल्याने सध्या बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने भाज्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, आणखीही दरात वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने फळबाग भाज्यांच्या दरात वाढ होत असून वांगी 80, टोमॅटो-80, कांदा-50 तसेच कोथिंबिरीचे-40 रु पेंडी अशाप्रकारे दर भडकले आहेत. किरकोळ बाजारात दरात वाढ झाली असली तरी, घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी दर मिळत आहे.


मध्यंतरी भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दर गडगडल्याने शेतकऱ्यांनी भाज्या फुकट दिल्या तर काही ठिकाणी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते त्यामुळे भाज्यांची क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. सध्या वांगी-80 टोमॅटो-80, कोथिंबी-40 तर कारले, भेंडी, मिरची, गवार, कोबी,फ्लावर यांचे दर 80 ते 100 रु. प्रति किलोवर गेले आहेत.पेट्रोल डिझेल या इंधनाचे दर रोजच वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढल्याचे प्रमुख कारण इंधन मानले जात आहे.

# कोथिंबीर उत्पादकांना बाजार भावाची साथ #
परतीच्या पावसाने कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले असले तरी आता मात्र उच्चांकी बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

litsbros

Comment here