पिंपळवाडी येथील दफनभूमीसाठी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे करमाळा तहसीलदारांना निवेदन
करमाळा
दि.२३ प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे पिंपळवाडी येथे दफनभूमीसाठी ग्रामपंचायत ने प्रस्ताव दिला असून त्यावर आणखीन कोणतीही कार्यवाही झाली नसल्या कारणाने सदर प्रस्तवाला लवकर मंजुरी देण्यात यावी यासाठी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाच्या वतीने करमाळा तहसीलदार मा. समीर माने यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये म्हटले आहे कि, मौजे पिंपळवाडी गावामध्ये मुस्लीम समाजासाठी दफनभूमी नसल्यामुळे मुस्लिमांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पिंपळवाडी ग्रामपंचायतने शासन निर्णयाप्रमाणे जूनमध्ये दफनभूमीसाठी ठराव मंजूर करून तसा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसून सदरचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून मुस्लीम समाजाची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी सदर निवेदनामध्ये केली आहे.
यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, कार्याध्यक्ष कय्युम शेख, शहराध्यक्ष कादिर शेख, सचिव मैनुदीन शेख, अश्पाक शेख यांच्यासह सुरज पाटील, रामचंद्र बरडे, बहुजन क्रांती मोर्चाचे आर. आर. पाटील, दिनेश दळवी, दिनेश माने, तैयब शेख, अलीम खान, हसन शेख, महेबूब शेख, इमाम शेख, आय्युब शेख, राजू शेख, दादा शेख, रहिमान शेख, पापामिया शेख, जावेद शेख, सोहेल शेख, साहिल शेख, बाबू शेख, इंन्नुस शेख, शाहरुख शेख, शब्बीर शेख, सुलतान शेख, असिफ शेख आदींजन उपस्थित होते.
Comment here