आरोग्यकरमाळा

करमाळा – कर्जत रोडवर पिंपळवाडी भोसे काॅर्नर ठरतोय अपघाताला निमंत्रण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा – कर्जत रोडवर पिंपळवाडी भोसे काॅर्नर ठरतोय अपघाताला निमंत्रण

करमाळा (प्रतिनिधी): करमाळा – कर्जत मार्ग हा अहमदनगरला जोडणारा रस्ता असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढत आहे. याच मार्गावर करमाळयापासून चार किलोमीटर अंतरावर पिंपळवाडी फाटा असून येथे अतितिव्र वळण आहे. दररोज येजा करणाऱ्या वाहनांना या वळणाची सवय झालेली आहे, परंतू नविन वाहनांना माञ हे वळण चकवा देत असून या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा वाहनांचा अपघात झाला आहे. मनुष्यहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या वळणावर गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही अंशी अपघाताला आळा बसणार आहे.

litsbros

Comment here