करमाळाराजकारण

‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘या’ मागण्यांसाठी करमाळा तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानीने केले धरणे आंदोलन

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना व भैरवनाथ विहाळ. तसेच कमलाई कारखान्यावरील उसाचे एफ आर पी. बिल देण्याच्या संदर्भात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार समीर माने करमाळा यांनी सात दिवसात कारखान्यावर कारवाई करुन शेतकऱ्यांचे पैसे देऊ असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पक्षाध्यक्ष शिवाजी पाटील.व जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे. जिल्हा पक्ष, उपाध्यक्ष दिपक शिंदे.करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, तालुका ‌ युवा अध्यक्ष अमोल घुमरे,

तालुका पक्ष अध्यक्ष बापू फरतडे तालुका युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे, राष्ट्रवादीचे चौरे सर, सरपंच सौंदे पांडुरंग साळुंखे, जातेगाव शाखा अध्यक्ष अशोक लवंगारे, शाखा उपाध्यक्ष विशाल शिंदे, सचीव दादा ससाने, शाखा संघटक अविनाश पाटील.सचीव सागर माने. रावगावचे स्वाभिमानी नेते बलभिम धगाटे, रावगाव ग्रामपंचायत सदस्य ज्योतिराम धगाटेव इतर शेतकरी उपस्थित होते.

litsbros

Comment here