करमाळा

करमाळा तालुक्यातील जनतेला वीजबिल व शैक्षणिक शुल्कात सवलत मिळण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील जनतेला वीजबिल व शैक्षणिक शुल्कात सवलत मिळण्याची मागणी

केतूर (अभय माने) कोरोना लॉकडाऊनच्या काळात छोटे उद्योग,व्यवसाय बंद झाल्याने सर्वसामान्य आर्थिक संकटात आहेत त्यामुळे राज्य सरकारने कमीत कमी 200 युनिटचे वीजबिल तसेच शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक शुल्कात 50 टक्के कपात करावी व तसे आदेश द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अजित विघ्ने यांनी केली आहे.

लॉकडाऊन काळामध्ये संचारबंदी असल्याने सर्वसामान्यांना घराबाहेर पडता आले नाही तर उद्योग-व्यवसाय, दुकाने बंद असल्याने सर्वांनाच आर्थिक फटका बसला आहे.

त्यामुळे आर्थिक आवक-जावक पूर्णपणे थांबली होती आता मात्र महावितरणने वीज बिल थकबाकी च्या कारणाने थकित असणारे वीजबिल भरण्याचा तगादा लावला आहे

तर सन 2021 -22 या वर्षातील शैक्षणिक वर्ष 15 जून रोजी सुरू झाले आहे काही ठिकाणी शाळा ही भरवण्यात करण्यात आल्या आहेत.

परंतु शैक्षणिक शुल्कात कोणतेही सवलत मिळाली नाही त्यामुळे 50 टक्के सवलत मिळावी याचबरोबर दिल्ली सरकार प्रमाणे राज्यातही दोनशे युनिट वीज बिल माफ करावे अशी मागणी अॅड.विघ्ने यांनी केली आहे.

litsbros

Comment here