करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
पोंधवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारला चिखलापासून पर्यावरणपूरक गणराया!
करमाळा (प्रतिनिधी): जि.प.प्रा.शाळा पोंधवडी येथे इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी पदवीधर शिक्षिका मनीषा हरिश्चंद्र पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलापासून पर्यावरण पूरक आकर्षक गणपती मूर्ती तयार केली.
या स्वतः तयार केलेल्या गणपतीचीच प्रतिष्ठापना सर्व विद्यार्थी वर्गामध्ये करणार आहेत व प्रत्येकाच्या घरीही अशाच पर्यावरण पूरक गणपती तयार करून प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. असे शिक्षिका मनीषा पेटकर यांनी बोलताना सांगितले.
पोंधवडी येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून व सबंध करमाळा तालुक्या मधून कौतुक होत आहे.
Comment here