करमाळा येथे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपाचा ४५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
करमाळा :- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात भाजपचा ४५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात गुरुप्रसाद मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी प्रथमतः दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले व भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाचे पुजन सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गणेश चिवटे म्हणाले की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गत काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचे काम केले आहे , दोन खासदारपासून सुरवात केलेल्या भाजपने देशात स्वबळावर सत्ता आणली आहे, स्व. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यासह हजारो नेते व लाखो कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यात दीड कोटी सभासद नोंदणी करण्यात आली आहे, आज भाजपा हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे.आपण भाजपमध्ये सक्रिय सभासद आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी शहराध्यक्ष जगदीशजी अग्रवाल व जेष्ठ नेते भगवान गिरी गोसावी यांनी भारतीय जनता पार्टीचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा कार्यकाळ सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना आपल्या मनोगतातून सांगितला,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी मानले.
हेही वाचा – मेजर अक्रुर शिंदे यांना अँन्टी करप्शन बोर्ड दिल्लीचा महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार.
यावेळी सरचिटणीस काकासाहेब सरडे,युवा मोर्चा ता.अध्यक्ष अमोल पवार, तालुका उपाध्यक्ष बंडू शिंदे,ओबोसी जिल्हा उपाध्यक्ष अमोल जरांडे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, विष्णू रणदिवे , संतोष कुलकर्णी, सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, राजु सय्यद, प्रविण बिनवडे, प्रदिप देवी, बाळासाहेब कुंभार, नवनाथ नागरगोजे, प्रकाश ननवरे, भैय्याराज गोसावी, अशोक ढेरे, हर्षद गाडे, महिला आघाडीच्या संगीता नष्टे, चंपावती कांबळे, ढोके मॅडम, किरण बागल, शिवाजी बोराटे, उमेश मगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.