करमाळा तालुका क्रिडा स्पर्धेचे आयोजक पदाची साळुंखे याची नेमणूक अखेर रद्द; शिक्षक भारतीने घेतला होता आक्षेप

करमाळा तालुका क्रिडा स्पर्धेचे आयोजक पदाची साळुंखे याची नेमणूक अखेर रद्द; शिक्षक भारतीने घेतला होता आक्षेप

केम (प्रतिनिधी संजय जाधव);
करमाळा तालुका क्रिडा स्पर्धा २०२३ ०२४
करमाळा तालुक्यात चालू असणाऱ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा विभागाकडून केले जाते.या क्रीडा स्पर्धांचे आयोजक म्हणून मुकुंद साळुंखे यांची नेमणूक क्रीडा विभाग यांनी केली होती. ही नेमणूक करताना साळुंखे यांनी आपण सेवानिवृत्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांना सांगितली नव्हती. या नेमणुकीस शिक्षक भारती संघटना करमाळा यांनी आक्षेप नोंदवला होता.

मुकुंद साळुंखे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांना क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहण्याचे अधिकार नाहीत ही भूमिका शिक्षक भारतीने तक्रारीत मांडली होती. शिक्षक भारतीच्या या मागणीस, केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी मोरे साहेब यांनी आज शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष सुजितकुमार काटमोरे सर यांच्या कडे मुकुंद साळुंखे यांची नेमणूक रद्द करून नवीन क्रीडा समन्वयक यांच्या नेमणुकीचे पत्र दिले.

हेही वाचा – बागल यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याचा हल्ला; शेतकऱ्यांत दहशत, तात्काळ बंदोबस्त न केल्यास वन अधिकाऱ्यांना काळे फासू.. रासपचा इशारा!

स्वनिधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र करमाळा शाखे तर्फे कर्ज वाटप

शिक्षक भारतीच्या या आंदोलनामुळे बेकायदेशीर कामांना आळा बसला आहे. क्रीडा सामन्यांचे आयोजन हे कोणाची मक्तेदारी नसून शासकीय काम आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line