करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद; चार दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद; चार दिव्यांगांना तीन चाकी सायकल चे वाटप

करमाळा (प्रतिनिधी);
शहरातील चार अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल वाटप करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकाऱ्यांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला असून ज्यांना आधार नाही त्यांना आधार देण्याचे काम या वैद्यकीय मदत कक्ष मार्फत होत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केले.


यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे भरत अवताडे वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मयुर यादव कार्याध्यक्ष संजय शीलवंत शिवसेना तालुका समन्वयक संजय शिंदे कैलास वासी बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड युवासेनेचे अध्यक्ष विशाल गायकवाड उपशहर प्रमुख संतोष गणबोटे संजय भालेराव पंकज परदेशी उमेश पवार सागर गायकवाड वैद्यकीय मदत कक्षाचे सल्लागार पत्रकार नासीर कबीर प्राध्यापक अशोकराव नरसाळे पत्रकार विशाल घोलप दिनेश मडके संजय चौगुले संजय कुलकर्णी अविनाश जोशी सिद्धार्थ वाघमारे शंभूराजे फरतडे अतुल बोकन नागेश शेंडगे निलेश चव्हाण राजेंद्र मिरगळ केशव साळुंखे-पाटील देवानंद बागल सागर गायकवाड सुरज इंदुरे मिलन जपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सातशे रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले आहेत कोरोना च्या काळातील गोरगरीब रुग्णांना लाखो रुपये किमतीचे इंजेक्शन्स मोफत देण्यात आले आहेत अनेकांचे रूग्णालयाचे बिल कमी करून घेतले आहे.

हेही वाचा-कोरोनामुळे आई वडीलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांना जिजाऊ गुरुकुल देणार मोफत शिक्षण

पैसे कमवण्याचे अमिष दाखवून लूटणाऱ्या ‘या’ मोबाईल अ‍ॅपपासून सावध राहा, चुकूनही डाउनलोड करू नका

शिवसेनेच्या वतीने एक अद्यावत रुग्णवाहिका मोफत 24 तास रुग्णांना सेवा देत आहे करमाळा शिवसेनेची ऑक्सिजन बँक सुरू आहे अशी अत्यंत समाजोपयोगी काम वैद्यकीय मदत कक्ष मार्फत सुरू आहे
यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामाचे कौतुक केले.

litsbros

Comment here