करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार

सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

मुलाणी यांच्यावर होत आहे शुभेच्छाचा वर्षाव

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने सण 2022 व 23 मधील उत्कृष्ट कामाबद्दल अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शेलगाव वीराचे तालुका करमाळा येथील सौ रुबीना कमुलाल मुलाणी मॅडम यांना आदर्श अंगणवाडी सेविका या पुरस्काराने सन्मानित केले आहे हा पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरीकीले या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सदरचा सन्मान सोहळा सोलापूर येथे पार पडला मुलाणी सध्या करमाळा तालुक्यातील शेलगाव वीराचे येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे .

रुबीना मुलाणी यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, विस्तार अधिकारी संदीप रणदिवे, सुपरवायझर आतकर मॅडम तसेच सौ वंदना चोले तसेच शेलगाव येथील सरपंच आत्माराम वीर, ग्रामसेवक खाडे भाऊसाहेब, तसेच सचिन वीर लखन डावरे व राहुल कुकडे, आदींनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

आदर्श अंगणवाडी सेविकां म्हणून रुबीना मुलाणी हिचा जिल्हा परिषदेने सन्मानित केल्याबद्दल योग्य व्यक्तीचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया समाज मनातून येत आहे महिला बाल विकासाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात या नेहमीच अग्रेसर असतातया तसेच पालकांच्या शैक्षणिक उनिवा
बाबत जागृती करण्याचे काम ही त्या करत आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हेहो वाचा – श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम याठिकाणी भित्तीपत्रिका उदघाटन करून मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

मी माझ्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत स्वच्छ व पारदर्शकपणे काम केल्याबद्दल मला सदरचा पुरस्कार मिळाला आहे माझ्या उत्कृष्ट कामाची दखल जिल्हा परिषदेने घेऊन मला माझा सन्मान केला त्याबद्दल मी जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व त्यांचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते भविष्यात असेच उत्कृष्ट कार्य करून मी माझ्या गावाचे तसेच तालुक्याचे नाव उंचावर नेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया आदर्श आंगणवाडी पुरस्कार प्राप्त सौ रुबीना मुलाणी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया बोलताना दिल्या

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line