करमाळासोलापूर जिल्हा

रावगाव येथील श्रीमती संगीता शिंदे ‘आदर्श अंगणवाडी मदतनीस’ पुरस्कार ; जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रावगाव येथील श्रीमती संगीता शिंदे ‘आदर्श अंगणवाडी मदतनीस’ पुरस्कार ; जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

करमाळा (प्रतिनिधी) ; रावगाव ता करमाळा येथील अंगणवाडी रावगाव-2क्रमांक- 20 येथील मदतनीस श्रीमती संगीता ज्ञानदेव शिंदे यांना एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन-2019-2020 या वर्षातील “आदर्श अंगणवाडी मदतनीस ” पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्यानी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याना आतापर्यंत सोशल फाऊंडेशन सोलापूर, कोरोना योध्दा, आदर्श माता असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हा कार्यक्रम जुळे सोलापूर येथे असलेल्या जामगुंडी मंगल कार्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी जावेद शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर, दिलीप स्वामी (भा.प्र.से.) मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिह पवार, श्रीमती स्वाती शटगार सभापती महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर, अनिरुद्ध कांबळे अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर,माने साहेब एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी करमाळा,सत्वशिला माचेवाड सुपरवायझर, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

litsbros

Comment here