करमाळा

करमाळा तालुक्यात लंम्पी प्रतिरोधक लसीकरणाला वेग; ‘या’ चार गावात झाले अठराशेहून अधिक जनावरांना लसीकरण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात लंम्पी प्रतिरोधक लसीकरणाला वेग; ‘या’ चार गावात झाले अठराशेहून अधिक जनावरांना लसीकरण

केत्तूर (अभय माने) ; करमाळा तालुक्यात जनावरातील लंम्पी स्किन प्रादुर्भावाचे पदार्पण केले असून, राजुरी येथे एक जर्सी गाय तर सावडी येथे एक गावरान गाय लम्पी स्कीन आजाराने मृत्यूमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

त्यामुळे त्यांनी या भागामध्ये लसीकरणाचा वेग वाढवला आहे. हे लसीकरण मोफत करण्यात येत आहे त्या अंतर्गत पारेवाडी येथे 700 , केत्तूर येथे 450, पोमलवाडी येथे 400, गुलमोहरवाडी येथे 270 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

असून,येत्या दोन दिवसात दिवेगव्हाण व हिंगणी येथील लसीकरण करण्यात येणार आहे.तालुका कृषीधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सोमनाथ खरात, डॉ.मनीष यादव,डॉ.आजिनाथ पवार, डॉ.अवधूत देवकर, डॉ.मंगेश जोळ आदिचे सहकार्य लाभले.

परिसरातील ज्या जनावरांचे लसीकरण राहिले आहे त्या पशुपालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

litsbros

Comment here