..म्हणून करमाळा पंचायत समितीचे सभापती ननावरे यांनी दिला राजीनामा
करमाळा(प्रतिनिधी) ; माझ्या पक्षातील नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, उपसभापती असताना एक वर्षा एवेजी 3 वर्ष दिली तर आता 31 डिसेंबर 2019 पासून मी करमाळा तालुका पंचायत समितीच्या सभापती पदावर आहे, तेही वरिष्ठांच्या अनुमतीने, मी समाधानी आहे आता पक्षातील इतरांना संधी मिळावी म्हणून मी माझा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे दिला आहे असे सभापती गहिनीनाथ ननावरे यांनी करमाळा माढा न्युजला बोलताना सांगितले.
लवकरच ननावरे यांचा राजीनामा मंजुर होईल मग त्यानंतर माजी आमदार नारायण आबा पाटील आपल्या गटातील कोणाला सभापती पदाची संधी देतात.? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या तरी महाराष्ट्र केसरी पंचायत समिती सदस्य अतुल पाटील व उपसभापती दत्तात्रय सरडे यांची नावे सभापती पदासाठी चर्चेत आहेत.
सध्या पंचायत समितीतीत शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता असुन १० सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात शिवसेनेच्या चिन्हावर (पाटील गट) निवडणूक जिंकलेले ०६ , काँग्रेस च्या चिन्हावर ०१ (जगताप गट) राष्ट्रावादी ०२ (बागल गट) तर अपक्ष ०१ अशी सदस्य संख्या आहे .
Comment here