करमाळाधार्मिक

बापरे.. उपवासाच्या पदार्थांचे दरही भडकले! वाचा किती आहेत दर?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बापरे.. उपवासाच्या पदार्थांचे दरही भडकले! वाचा किती आहेत दर?

केत्तूर (अभय माने) वर्तमान महागाईने सर्वसामान्यांची जीवन जगणे वरचेवर अवघड होत आहे. दैनंदिन गरजेच्या व असणाऱ्या वस्तू गहूं, तांदूळ, डाळी, खाद्यतेल यांची दरवाढ होतच आहे त्यातच जीएसटीची आणखी भर पडत आहे.

गेल्या महिन्याभरापासून साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा आदि उपवासाच्या वस्तूंचे दरही वाढता – वाढता वाढतच चालल्याने आता उपवास करणेही अवघड झाले आहे. असेच वाटत आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यापासून साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा आदि उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढते त्यातच आता नवरात्रीचे उपवास चालू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांची दरवाढ सामान्यांसाठी मात्र अन्यायकारक ठरत आहे.

वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक अक्षरशः भरडला जात आहे शेंगदाणा, भगर,साबुदाणा यांचे दरही वाढत आहेत त्यामुळे उपवास करणे अवघड झाले आहे.त्यापेक्षा उपवास न केलेल्याच बरा असेही बोलले जात आहे.

 

” वाढत चाललेल्या महागाईमुळे उपवास करणे अवघड झाले आहे त्यामुळे उपवास करताना विचार करावा लागत आहे.
– शुभांगी विघ्ने,गृहिणी,केत्तूर

” उपवासाच्या वस्तूंचे दर निश्चितच वाढले आहेत. यावर्षी प्रथमच साबुदाणा उच्चंकाने वाढला आहे परंतु, नवरात्रीमध्ये दर निश्चितच कमी होतील.

– सुहास निसळ,/ दिलीप खेडकर, किराणा व्यापारी,केत्तूर

उपवासाच्या पदार्थांचे एक ‘ पूर्वीचे दर व आत्ताचे दर कंसात

साबुदाणा – 65 (80 ते 85)

शेंगदाणे – 105 (125)

भगर – 100 (120)

litsbros

Comment here