करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची हजेरी
केत्तूर (अभय माने) केत्तूर (ता.करमाळा) परिसरात गेली तीन दिवसांपासून आभाळ भरून येत आहे परंतु पाऊस मात्र होत नव्हता परंतु आज बुधवार (ता.5) पाच वाजता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तसेच हवेत गारवा निर्माण झाला.
केत्तूर (ता.करमाळा) परिसरात जुलैच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत दडी मारून बसलेला पाऊस बुधवार पासून करमाळा तालुक्यात कमी अधिक प्रमाणात रिमझिम पाऊस बरसण्यास सुरवात झाली आहे.
बुधवार (ता.5 ) रोजी केत्तूर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी 5 नंतर सुरुवातीला जोरदार व नंतर रिमझिम पाऊस सुरू होता.
पावसाची पडती भावना सुरू झाल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.थांबलेल्या खरिपाच्या पेरण्या आता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोमेजून लागलेल्या ऊस पिकाबरोबरच फळबागानाही या पावसाने दिलासा मिळाला आहे.