** कडी-कोयंड्याला टेन्शन कुलपाचं **
****************************
आता हे बघा आजकालच्या जमान्यात म्हणजे जनरेशन मध्ये प्रत्येक विद्यार्थी हा बहुदा आठवी नववी पर्यंत तरी शिकलेला असतो आता त्यात बीजगणित या विषयामध्ये जे समीकरण असतं त्याची फोड करून दाखवणे तर आता आपण हीच संज्ञा वापरून थोड्या जागेमध्ये तीच किंमत कशी बसवायची दुसरे जे आहे त्याची फोड करणे किंवा विस्तृतपणे सांगणे म्हणजे यात कोठेतरी बंधन आलं तसेच रोजच्या जीवनामध्ये पण प्रत्येक गोष्ट अशी आहे की प्रमाणबद्ध ही खूप मोठी व्याख्या आहे स्वयंपाकामध्ये मीठ पाहिजे पण प्रमाणबद्ध प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर अन्न वाया जाते आणि त्यापासून मिळणारे आत्मिक समाधान मिळत नाही आता हे झालं गणित किंवा सर्वसामान्य जीवनाचं आता आपण एका वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत आणि ते म्हणजे महत्त्वाचं आता कुलपाचा वापर करायचा म्हणजे बंधन व सुरक्षा आली.
कारण कोणतीही गोष्ट ही शक्यतो एकटी दुखटी कधीच नसते त्याला जोडीदारही असावीच लागते दार चौकट… कडी कोयंडा… घर-दार… बाजार हाट…करायला जायचं म्हणजे बाजार म्हणजे जेथे ग्राहक व विक्रेता ही एक बाजू पण हे बसणार कुठे शेतात किंवा नदीवर बसू शकत नाही तर हे बसणार योग्य मोकळ्या जागेवर त्यालाच आपण बाजार पटांगण म्हणतो म्हणजे जुनी लोकं त्याला हाटा वटा म्हणायचे म्हणजे हाट तर कडीकोयंडा हे आपल्याला घराचं जेव्हा बांधकाम करतो तेव्हा दरवाजाला ही असणे आवश्यक आहे इथपर्यंत चोराची शक्यता कमी पण असंच जर दार उघडे ठेवुन आपण काही वेळेपुरते बाहेर गेलो तर कोणी कुत्री मांजरं इतर उपद्रवी येऊन नासधूस करू शकतात म्हणून दार पुढे करून कडी लावावी लागते आता तेच आपण आपला परिसर सोडून चार दोन दिवस परगावी जायचं असेल तर कोयंड्या मध्ये कडी अडकवून त्यावर कुलूप लावावे लागते म्हणजे त्या कडीकोयंडा महत्वाची जबाबदारी.
प्रथम दोन्हीची ठिकाण वेगळी आपापल्या जागेवर स्थानापन्न झालेली पण कडी लावताना कडी-कोयंड्यात अडकवतो म्हणजे कडीला काम लावतो एखादे वेळी त्याच्या आवाक्याबाहेरची सुरक्षा असेल तर म्हणजे दिवसा ठीक आहे शेजारीपाजारी लक्ष देतात वावर असतो पण रात्र झाल्यावर चोर वगैरे उपद्रव करू नये व सुरक्षितते साठी आपण त्या कडीला कुलूप लावतो त्या कडीवर एक प्रकारे बंधन आलं की घराची सुरक्षा अजून प्रभावशाली झाली पाहिजे कारण ग्रामीण भागात घर बांधताना शेजारी शेजारी दोन खोल्या व शक्यतो पत्र्याच्या…त्या खोलीला थोडं आत गेल्यावर माणूस भर उंचीची भिंत त्याला पडवी म्हणतात त्याच्या पलीकडे स्वयंपाकाची सोय स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी बाहेरच्या खोलीत जेवायला बसायचं तिथेच बाहेर छोटसं बाथरूम केलेलं नाही तर आपलं दगड रचून कमरे एवढ्या उंचीचे गडगं ते बाहेर गेलेल्या सांड पाण्याच्या आळ्यातच दहा वीस अळूचे कांदे लावलेले बाहेर दारासमोर मोठं अंगण त्यावर मोठ्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन भिंतीतच केलेल्या देवळ्या अंगणात तुळशीवृंदावन त्याच्या पूर्व पश्चिम दिशेला देव देवळ्या त्यात रोजची संध्याकाळची दिवाबत्ती त्याचप्रमाणे समोरच्या मोकळ्या जागेत सपार करून गाई..शेळ्या…कोंबड्या…ची सोय केलेली अशी साधारण घराची रचना असते.
परिसर हा कायम गजबजलेलाच असतो म्हणून या खेड्यातील लोकांना क्वचितच कुलपाचा वापर करायचा योग येतो आता बघा वस्तू किंवा पृष्ठभाग म्हणजे दरवाजा किंवा चौकट जोडण्याच्या साठी वापरल्या जाणाऱ्या साधनाला कडी कोयंडा असे म्हणतात कोंयंड्यातून कडी काढल्यावर गरजेप्रमाणे दोन वस्तू किंवा बेस हे वेगळे करता येतात कडीला इंग्रजीमध्ये स्टेपल किंवा ती जर साखळी सारखी असेल तर फास्तेनिंग चैन म्हणतात कोंयंड्याला हास्प तसेच कोयंड्याला कुलूप लावता येते लाकडीपेटीचं म्हणजे पैशाच्या लाकडी गल्ल्याला त्याचा छोटा कोंयंडा त्याला खिट्टी म्हणतात त्याला कुलूप लावता येतं तसंच खिडकी बंद होऊ नये म्हणून हलक्या वजनाचा दरवाजा बंद ठेवण्यासाठी जी छोटी कडी असते तिला हूक आणि ती ज्याच्यात अडकवतात त्याला आय असे म्हणतात.
दरवाजा जर एक फळी असेल तर त्याला अंगचेच चौकटीला लॅच म्हणजे कुलूप लावलेले असते आता कुलपा बद्दल बोलायचं झालं तर मी अगदी लहान असल्यापासून याला बघत आलोय तर आमच्या घराचे लोखंडी धातूचे कुलुप आहे तसे कुलपाची अनेक प्रकार आहेत मॅग्नेट लॉक…मॅग्नेट की लॉक…सायकलचे कुलूप…आता आमच्याकडे जे कोण आहे त्याला दुकानातून आणल्यापासून त्याचा घराची राखण करण्याचा प्रवास सुरू झाला आता आपण जेव्हा सहकुटुंब बाहेर जातो त्यावेळी आपला पूर्ण विश्वास आपल्या त्या कुलपावर असतोयं
कारण एरवी स्वच्छंदी मनाने राहणारी वावरणारी कडी कोयंडा त्यातल्या त्यात कडी ही सहज जरी वाऱ्याची झुळूक आली तरी तो हलकासा दिलेला कमरेला हेलकावा पण जर कोयंडा आणि कुलुप जर साथीला असतील तर तिच्या त्या स्वच्छंदी पणावर एक प्रकारे अतिक्रमणचं होत असते तर कुलपाची एकंदर पार्श्वभूमी पाहिली तर एक गोतावळा म्हणजे भावकी म्हटलं तरी चालेल कारण दरवाजाला लावायचं कुलुप आणखी पाहायला गेलं तर आत्ताच्या संगणक युगामध्ये पण लॉक याला खूप महत्त्व व सुरक्षितता आहेत फार म्हणजे आपण जो मोबाईल वापरतो त्याला आणि त्याच्या प्रत्येक प्रणालीला लॉक करण्याची सोय आहे
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Comment here