जे.के फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित शिबिरात 102 जणांचे रक्तदान
वाशिंबे :-देशभक्त स्वर्गीय जगनाथ कृष्णा भोईटे यांच्या ५५ व्या जयंतीनिमित्त वाशिंबे येथे शरदचंद्रजी पवार विद्यालयात जे.के. फाउंडेशन मित्रपरिवार यांच्यावतीने रक्तदान शिबिर व मोफत मोतीबिंदू निदान ऑपरेशन शिबिराचे आयोजन केले होते.
कार्यक्रमची सुरवात मान्यवरांच्या हस्ते देशभक्त स्व.जगन्नाथ कृष्णा भोईटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ह.भ.प माऊली महाराज झोळ यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्धाटन केले.यावेळी मा.श्री.नेते नवनाथ बापू झोळ,शरदचंद्रजी पवार विद्यालयाचे अध्यक्ष रामदास बप्पा झोळ,सोसायटीचे मा.चेअरमन राजाभाऊ झोळ,शेतकरी संघटना उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ,संजय फरतडे,मुख्यध्यापक रमेश यादव,सहशिक्षक हरी शिंदे,महेश कुलकर्णी,सर्व शिक्षक,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.मोफत मोतीबिंदू शिबिरामध्ये १४५ महिला/पुरुष यांनी डोळे तपासणी केली असून त्यामध्ये ४२ जणांना अल्प दरात चष्मे वाटप केले.व ३४ जणांचे मोतीबिंदू ऑपरेशन साठी बुधाराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे येथे मोफत उपचार केले जातील.या शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवक,महिला,पुरूष यांनी सहभाग नोंदवला.
सामाजिक उपक्रम आयोजित करत जे.के फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर,मोफत मोतीबिंदू निदान नेत्र ऑपरेशन,पशुसंवर्धन लसीकरण,वृद्धांना आधार काठी वाटप,वृक्षारोपण,शालेय मुलांची हिमोग्लोबिन चाचणी आदी उपक्रम यांच्या वतीने राबवले जात आहेत.तीन वर्षामध्ये रक्तदान शिबिरात ५८८ युनिट रक्तसंकलन करून गावातील युवकांच्या सहकार्यांने जे.के.फाऊंडेनचे अध्यक्ष अमोल भोईटे हे असे समाजिक उपक्रम दरवर्षी राबवत आहेत.