जिनियस अबॅकस क्लास जेऊरच्या गुणवंतांचा सत्कार

जिनियस अबॅकस क्लास जेऊरच्या गुणवंतांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी –
प्रो ऍक्टिव्हअबॅकस द्वारे 8 जानेवारी 2025 रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत विविध राज्यातील एकूण 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या परीक्षेत जेऊर शहरातील जिनियस अबॅकस क्लासेसच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.

रिजनल अबॅकस परीक्षेत तेजस्विनी भिलारे हिने सहा मिनिटात शंभर गणिते अचूक सोडून प्रथम क्रमांक तर श्रीजय मदने याने 98 गणिते सोडव द्वितीय क्रमांक मिळवला तसेच वेदांत गोडगे द्वितीय क्रमांक प्रांजली भिलारे द्वितीय क्रमांक जान्हवी शहा तृतीय क्रमांक श्रेया मारकड चतुर्थ क्रमांक श्रुतिका पोटे चतुर्थ क्रमांक श्रेया पोटे चतुर्थ क्रमांक व अंजली भिलारे पाचवा क्रमांक वरील विद्यार्थ्यांनी यश मिळवून ट्रॉफी विनर झाले तसेच वरील 9 विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथील इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत निवड होऊन 28 जानेवारी 2025 रोजी झालेल्या परीक्षेत ही यश प्राप्त झाले आहे. याबरोबर जिनियस अबॅकस क्लासचे अथर्व पोटे ,स्नेहल पोटे, तेजस भिलारे, वैभव भिलारे, रीया चौगुले, श्रुती गुंडगिरे, अवनीश गुड, मोहम्मद साद शेख, पृथ्वीराज वाघमोडे, उत्कर्ष मंजरतकर, तनिष्का राखुंडे, आराध्या वेदपाठक , उमेरा फकीर या सर्वांनी गोल्ड मेडल मिळून यश संपादन केले. या सर्व मुलांचा सत्कार समारंभ यश कल्याणी सेवाभावी संस्थेत 22 मार्च 2025 रोजी संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दाभाडे, डॉ. निलेश मोटे, प्रा. विष्णू शिंदे, प्रा जयेश पवार, पत्रकार. सिद्धार्थ वाघमारे,डॉ,स्वाती बिले, सौ, राजकुंवर पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रा.गणेश करे पाटील सर होते. या कार्यक्रमात मुलांनी अबॅकस डेमोचे सादरीकरण केले यामध्ये तेजस्विनी भिलारे, वैभव भिलारे, श्रीजय मदने, प्रांजली भिलारे, अथर्व पोटे, श्रेया पोटे, श्रेया मारकड, वेदांत गोडगे यांनी अतिशय सुंदर डेमो सादरीकरण केले. तसेच तसेच जान्हवी शहा, तेजस भिलारे , श्रुती गुंडगिरे, तेजस्विनी भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून डॉ. स्नेहल शहा, सौ.रेश्मा गोडगे , सौ. निशा मदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ राजकुंवर पाटील मॅडम यांनी बोलताना अत्यंत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले की मुलांना वेळ देणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे पालकांनी किमान मुलांना दोन तास वेळ हा दिला पाहिजे . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गणेश जी करे पाटील सरांनी मुलांचे कौतुक केले व गणित हा विषय महत्त्वाचा आहे दैनंदिन जीवन जगताना मुलांना गणित हा विषय प्रत्येक ठिकाणी येतो गणित विषया बरोबरच इतर स्पर्धा परीक्षा किती महत्त्वाच्या आहेत याचेही मार्गदर्शन सरांनी मनोगता मधून व्यक्त केले.

हेही वाचा – बालचमुंच्या कलाविष्काराने पोफळजकर मंत्रमुग्ध…… यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून शाळेला बावीस हजारांची मदत तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान

सौदागर गव्हाणे यांना आदर्श शिक्षक तर कैलास सस्ते यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार एकाच वेळी विठ्ठलवाडीच्या दोन कर्तबगार सुपुत्रांचा झाला सन्मान

जिनियस अबॅकस क्लास च्या संचालिका अंकिता वेदपाठक मॅडम यांनी मुलांच्या यशाबद्दल क्लास तर्फे रायटिंग पॅड बक्षीस म्हणून दिले . क्लासला सलग सातव्या वेळेस बेस्ट सेंटर अवार्ड मिळाल्याने क्लासला संचालिका व त्यांची कुटुंब यांचा यश कल्याणी संस्थेकडून आदरातिथ्य सन्मान करण्यात आला. जेऊर भागामध्ये अबॅकस क्लासेस असूनही अबॅकस बरोबर फोनिकस क्लासेस ही नवीन संकल्पना वेदपाठक मॅडमनी आणली आहे . फोनिक्स क्लासेस चे उद्घाटन केले आहे .हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी व कल्याणी संस्थेचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंकिता वेदपाठक यांनी केले. मुलांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line