जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगाव पश्चिम येथे योग दिन उत्साहात साजरा
केत्तूर (अभय माने) सोगाव पश्चिम (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते,ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मोहिते,सरपंच विशाल सरडे, शाळासमिती अध्यक्ष विशाल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. योग दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि उपस्थितांना योगाचे धडे देण्यासाठी श्रीकांत मोरे, बाळासाहेब पठाडे,रवींद्रकुमार पवळ,शिवाजी गोडगे,पद्मिनी काळे यांनी प्रत्यक्ष योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना योगासने सहजपणे समजून घेता आली.
हेही वाचा – गणेश चिवटे यांच्या शालेय साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांचे चेहेरे फुलले
30 वर्षांनी झाली मित्र मैत्रिणीची भेट
या कार्यक्रमाला अंगणवाडीच्या अंगणवाडी सेविकाही उपस्थित होत्या, ज्यामुळे समाजातील विविध घटकांचा सहभाग दिसून आला. एकंदरीत, सोगाव पश्चिम शाळेतील योग दिन कार्यक्रम यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.
छायाचित्र-सोगाव (पश्चिम) :