माढासोलापूर जिल्हा

जिल्हा परिषद केंद्र शाळा अंजनगाव खेलोबा येथे शिक्षक दिन संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जिल्हा परिषद केंद्र शाळा अंजनगाव खेलोबा येथे शिक्षक दिन संपन्न

माढा प्रतिनिधी – 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा अंजनगाव खेलोबा या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेतील सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप भैय्या चौगुले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नवनाथ अण्णा इंगळे सर यांनी भूषविले.

या कार्यक्रमासाठी उद्योजक  पांडुरंग चौगुले मालक तसेच युवा उद्योजक अजिंक्य पाटील लखन डोके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक जाधव शाळा व्यवस्थापन समिती मधील शिक्षण प्रेमी सदस्य विनायक चौगुले शाळा व्यवस्थापन समितीतील इतर सदस्य  रवींद्र इंगळे, रेणुका पाटेकर, मेघा माळी व प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन श्री विनायक जाधव यांनी केले.

हेही वाचा – 32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनाथ अण्णा इंगळे सर हे होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक याविषयी मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या
शिक्षकांनी आजच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून आपल्या शाळेचे नाव आणखीन चांगल्या प्रकारे उज्वल करण्यासाठी प्रयत्न करू असे सर्वांना आश्वासित केले.

litsbros