जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास निधीतून वीट येथे ‘इतक्या’ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या विकास निधीतून वीट येथे ‘इतक्या’ लाखांच्या विकास कामाचे उद्घाटन

करमाळा(प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब व माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मौजे – विट गावासाठी ८१.५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये वीट ते बरडे वस्ती रोड दहा लाख रु,इनामदार वस्ती ते आढळेवस्ती रोड सहा लाख रु,शाळा दुरुस्ती यामध्ये विट गाव शाळा दोन लाख रु,गाडे वस्ती शाळा तीन लाख रु,चोपडे वस्ती शाळा दोन लाख रु,रेवन नाथ मंदिर पत्रा शेड व घट बांधणी सात लाख रु,राघू चांदणे ते कोंढाबाई चांदणे घर (अण्णाभाऊ साठे नगर)सात लाख रु,आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती सात लाख रु,दलित वस्ती स्मशानभूमी सूशोभीकरण दलित वस्ती पेव्हर ब्लॉक रोड चार लाख रु,सुभाष जाधव वस्ती डीपी चार लाख रु,गाडे वस्ती ते अंकुश ढेरे वस्ती रोड चार लाख रु,कैकडी मळा सहा लाख रु,हनुमंत आवटे डीपी तीन लाख रु,भोसले वस्ती डिपी साडेआठ रु,स्ट्रीट लाईट ५ दिवे आठ लाख रु, इत्यादी कामाचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवानगिरी गोसावी यांनी केले ,तर गणेश चिवटे यांनी आपल्या मनोगतात वीट गावच्या विकासासाठी भविष्यातही जास्तीत जास्त निधी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करीन असे अभिवचन दिले,
विट गावासाठी गणेश भाऊंनी भरगोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वीट ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी
जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे,विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब गाडे,

उपसरपंच अंकुश जाधव, भगवानगिरी गोसावी, अशोक ढेरे, देविदास ढेरे , हर्षद गाडे ग्रामपंचायत सदस्य गजानन भोसले, विशाल गंगे ,महादेव जाधव ,गणेश ढेरे ,जगदीश निंबाळकर, धनसिंग भोंग , रोजगार हमी सेवक कृष्णा ढेरे ,माजी उपसरपंच समाधान कांबळे ,सुभाष जाधव,

ग्रामपंचायत सदस्य हेमंत आवटे , आजिनाथ पवार,पोपट गाडे डॉक्टर, बाळासाहेब ढेरे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय गाडे ,विश्वनाथ ढेरे ,माजी ग्रामपंचायत सदस्य हरी आवटे ,आप्पा जाधव ,अर्जुन आवटे,

हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक खा. शरद पवार यांच्या हाती; लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

अशोक राऊत ,जालिंदर गाडे ,सुभाष गाडे ,संतोष ढेरे ,संजय गाडे, दत्तात्रय गाडे, रवी ढेरे ,हनुमंत आवटे, मनोज ढेरे ,अविनाश गाडे ,लहू गाडे, दादा ढेरे ,अमोल आढळे ,विलास जाधव, आश्रू कांबळे, उमेश गाडे ,रवी गाडे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line