करमाळाक्राइमजेऊरसोलापूर जिल्हा

जेऊर हद्दीत धावत्या रेल्वेतुन पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर हद्दीत धावत्या रेल्वेतुन पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन, वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी) ; जेऊर हद्दीत रेल्वे मधून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू तपास चालू असून ओळख पटल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन मिळालेल्या माहिती नुसार जेऊर रेल्वे स्टेशन येथे दिनांक 30सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजून 45 मिनिटं पूर्वी एक अकस्मात मयत कि.मी नं 341/7-8 च्या मध्ये धावत्या रेल्वेतून पडून एक अनोळखी व्यक्ती मयत झाला असून त्याची ओळख पटवण्याचा तपास चालू आहे .


सदर व्यक्तीचे अंदाजे वय 60 ते 65 वर्ष असून अंगाने मध्यम रंगाने निमगोरा चेहरा उभट नाक सरळ उंची 160 सें मिटर डोळे अर्धवट उगडे अंगात पांढरा मळकट रंगाचा व अर्धा फिक्कट निळ्या रंगाचा टी शर्ट टी शर्ट वर श्रीमंत महादेव गल्ली नवरात्र मंडळ , त्यावर धनंजय नाना गोंदील असे छापलेले आहे.


सदर मयाताचा तपास पो.हवा शिवाजी रंगनाथ रोकडे हे करत असून ओळख पटल्यास कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे .

हेही वाचा- सीना कोळगाव धरणाचे २१ पैकी १६ दरवाजे उघडले; धरणा खालील गावांना सतर्कतेचा इशारा; पाणीच पाणी

करमाळा तालुक्यातील देलवडी आठ दिवसापासून आहे अंधारात; डीपीवर खाजगी मालकी?

litsbros

Comment here