करमाळाजेऊर

कौतुकास्पद- उत्कृष्ट कामगिरीबद्दल जेऊर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उत्कृष्ट कामगिरीबद्दल जेऊर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

जेउर (प्रतिनिधी) जेऊर येथील बहुचर्चित ग्रामीण रुग्णालयामध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर 12 मे 20 21 रोजी सुरू करण्यात आले होते. अनंत अडचनिंचा सामना करून 1 महिन्यापूर्वी आ.संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून हे कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते.

या ठिकाणी 10 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या तालुक्यातील कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने घटत असल्यामुळे आज जेऊर येथील कोवीड केअर सेंटर बंद करून तेथील कर्मचारी वर्ग व रुग्ण उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 1 महिन्यापासून हे कोवीड केअर सेंटर सुरू असताना त्यामध्ये ॲडमिट केलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेल्या नाही. या विशेष कामगिरीबद्दल तेथील कर्मचाऱ्यांचा सत्कार स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.

हेही वाचा- जेऊर ग्रामपंचायतीत पुन्हा खळबळ; कुणाला दिलासा? कुणाला धक्का.? वाचा सविस्तर

करमाळा पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; ‘या’ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डॉ.तुषार नाळे ,डॉ. जीवन मेहेर त्याचबरोबर इतर कर्मचारी बालाजी लेकुरवाळे ,हरिदास किरवे, अनिरुद्ध शेलार ,अनिकेत राऊत, सुनील हांडे या कर्मचाऱ्यांचा सत्कार विलास दादा पाटील चंद्रहास निमगिरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बालाजी गावडे, उमेश पात्रुडकर, राकेश पाटील, शिवम कोठावळे, अजिनाथ माने ,नाना लोंढे, दिनेश खटके, सुहास शिंदे शलमोन केसकर आदी उपस्थित होते.

litsbros

Comment here