कोरोना काळात प्रहार धावली गरजूंच्या मदतीला
जेऊर(प्रतिनिधी) ; कोरोना काळात गोरगरीब गरजूंना पुन्हा एकदा प्रहार संघटनेकडून मदतीचा हात देण्यात आला असून शंभराहून अधिक कुठुंबियांना धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आलाय.
सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगानं जगात अःहाकार माजवला असून कोरोनाचे वाढती रूग्ण संख्या पाहता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आल आहे.त्यामुळं हातावरच पोट असणाऱ्या गोरगरिबांना उपासमारीला सामोर जाव लागत आहे.
आता अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून गोरगरिबांच्या मदतीला धावत असल्याने राजकीय क्षेत्रातूनही आमदार खासदारांचा एक महिन्यांचा पगार तर प्रशासनातील क्लास वन राजपत्रित अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा आणि कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार गोरगरिबांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय नुकताच शासनस्तरावरून घेण्यात आला आहे.
प्रहार संघटना गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून गरजूंनी कोणत्याही सेवेसाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकारयांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रहार संघटने तर्फे करण्यात आलं आहे.
धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याने अडचणीत सापडलेल्या अनेक गोरगरिब वंचित घटकाकडूंन प्रहार संघटनेविषयी समाधान व्यक्त करण्यात येतय.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता (भाऊ)मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटना शहराध्यक्ष अजित (भाऊ) कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार शहर संपर्क प्रमुख जमीर शेख जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली मुदस्सर हुंडेकरी माजिद पटेल अशपाक शेख यांच्यासह आदी प्रहार सैनिक उपस्थित होते.
हेही वाचा-करमाळा तालुक्यातील युवा नेतृत्वाचा मुंबईत होणार गौरव; अभिषेक आव्हाड यांना पुरस्कार जाहीर
उजनीवर प्रस्तावित उपसा सिंचन योजने बाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी मांडली ‘ही’ भूमिका
राजकीय क्षेत्रातूनही गोरगरिबांना मदत व्हावी अशीच अपेक्षा सध्यातरी सर्व सामान्य जनतेमधून होत असल्याच चित्र दिसत आहे.
Comment here