जेऊर येथे माहेर कट्ट्याच्या वतीने लेक लाडकी वारकरी अभियान संपन्न
जेऊर प्रतिनिधी –जेऊर येथे माहेर कट्ट्याच्या वतीने लेक लाडकी वारकरी अभियान राबविण्यात आले. सदर अभियानाच्या माध्यमातून माहेर कट्टा जेऊर च्या महिलांनी दिंडी काढून मुलींना वाचवण्याबाबत तसेच मुलींच्या शिक्षणाबाबत प्रबोधन केले.
महिलांनी जेऊर पासून आदिनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत दिंडी काढून ‘मुलगीच असते आधार, मुलगीच आहे उद्याची शिल्पकार’ मी आहे. मंत्र आहे नव्या युगाचा मुलाला हक्क द्या शिक्षणाचा’ तसेच ज्ञानोबा- तुकाराम चा जयघोष करत स्रीभ्रूण हत्या, मुलींचे शिक्षण, आरोग्य याबाबत दिंडीतील वारकऱ्यांचे प्रबोधन केले.
या दिंडीत डॉ. शारदा सुराणा, ऍड. सविता शिंदे, रामकुवर येवले, नंदा लोंढे, वैशाली पथरूडकर, कविता बोराडे, मनीषा लोंढे, सौ. केकान, अवसरे, लोंढे, सोनवणे, मंगल शिंदे इ. महिला सहभागी झाल्या होत्या.