करमाळाजेऊरपुणेसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील अरिफ सय्यद यांची मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग १ पदी नियुक्ती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील अरिफ सय्यद यांची मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग १ पदी नियुक्ती

करमाळा (प्रतिनिधी) ; जेऊर येथील अरिफ अहमद सय्यद यांची मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली असून त्यांनी दिनांक 1/7/2022 रोजी आपले पदाचा पदभार स्वीकारला.

अरिफ सय्यद हे मूळचे जेऊर येथील ग्रामीण भागातील असून त्यांचे शिक्षण प्राथमिक शाळा जेऊर भारत हायस्कूल जेऊर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व पुढील पदवी उत्तर पदवीचे शिक्षण वालचंद महाविद्यालय सोलापूर येथे झाले.

 सय्यद हे 1998 मध्ये प्रथम स्पर्धा परीक्षेद्वारे परिविक्षा अधिकारी या पदावर महिला व बालकल्याण विभाग नागपूर येथे रुजू झाले. त्यानंतर ते सन 2000 मध्ये अधीक्षक रिमांड होऊन पंढरपूर येथे बदलीने हजर झाले.

शासकीय कुष्ठधाम केडगाव ता.करमाळा येथे इथे अधीक्षक या पदावर कार्यरत होते. दरम्यान पुन्हा दे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रशासकीय अधिकारी वर्ग 2 ची परीक्षा पास होऊन प्रथम नियुक्तीने उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे हजर झाले.

सन 2015 ते 2022 पर्यंत ते जिल्हा परिषद आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत होते. मार्च 2022 रोजी नुकतीच त्यांची बदली उपसंचालक आरोग्य सेवा (एचआईव्हीएस) पुणे येथे झाली होती.

दिनांक 30/6/2022 चे शासन निर्णयाद्वारे त्यांची मुख्य प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर पदोन्नती झाली असून ते उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे येथे दिनांक 1/7/2022 रोजी हजर होऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे.

सदर प्रसंगी डॉक्टर संजोग कदम उपसंचालक आरोग्य सेवा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला असून त्याप्रसंगी त्यांची पूर्वीचे व सध्याचे कार्यालयातील सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जेऊर येथील ॲड शहानुर सय्यद यांचे ते धाकटे बंधू आहेत.

litsbros

Comment here