जेऊर येथे तालुक्यातील गुणवंत व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन

जेऊर येथे तालुक्यातील गुणवंत व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन

करमाळा (प्रतिनिधी); उद्या जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जून सरक यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती देताना सरक सर यांनी सांगितले की केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या करमाळा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डिवाय एसपी मा श्री अजित पाटील (केंद्रीय गृहमंत्री पदक विजेते पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत.

यासाठी आय ए एस अधिकारी कु. शुभांगी पोटे (शेलगाव-वांगी) ,आय एफ एस अधिकारी तुषार शिंदे (कंदर), पी एस आय अमित लबडे (शेटफळ), पी एस आय निखील सरडे (चिखलठाण), पी एस आय सागर पवार (सरफडोह), पी एस आय श्रीकांत गोडगे (पुर्व सोगाव), पी एस आय ओंकार धेंडे (जिंती), पी एस आय दत्तात्रय मिसाळ (कोर्टी), पी एस आय अभिजित ढेरे (वीट), सोनाली हनपुडे (गौंडरे), पी एस आय विद्या कळसे (गुळसडी), पी एस आय पल्लवी मारकड (उमरड) या यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत. सदर कार्यक्रम उद्या सोमवारी दि 10 जूलै रोजी भारत महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ठिक दोन वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाला आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कारखाना संचालक, शैक्षणिक संस्था पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षक, प्राध्यापक आदिंना विशेष निमंत्रण दिले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत महाविद्यालय तसेच माजी आमदार नारायण (आबा) पाटील कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केले गेले आहे. तरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तसेच सुजाण नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आव्हान मावेळी सचीव प्रा अर्जून सरक यांनी केले.

हेही वाचा – गणेश चिवटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; करमाळा तालुक्यातील ‘हे’ प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे लागतील? वाचा सविस्तर माहिती

यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, भारत महाविद्यालय प्राचार्य डाॅ अनंतराव शिंगाडे, भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, मा. आ. नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा डाॅ संजय चौधरी उपस्थित होते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line