करमाळा तालुक्यातील जेऊर सह ‘या’ 16 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; पाच नोव्हेंबरला होणार मतदान तर..

करमाळा तालुक्यातील जेऊर सह ‘या’ 16 ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; पाच नोव्हेंबरला होणार मतदान तर..

जेऊर (प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यातील जेऊर सह 16 ग्रामपंचायतचा अखेर बिगुल वाजला असून येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून सहा नोव्हेंबरला मतमोजणी आहे.

यामध्ये जेऊर सहीत केम चिकलठाण कंदर या मोठ्या ग्रामपंचायतचा समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मुदत संपणाऱ्या 109 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे.

तर करमाळा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला रोजी मतमोजणी होईल.

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक –6 आॕक्टोबर 2023

नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृतीचा दिनांक सोमवार 16 आॕक्टोबर 2023 ते शुक्रवार 20 आॕक्टोबर 2023
अर्ज छाननी करण्याचा दिनांक : सोमवार 23 आॕक्टोबर 2023

हेही वाचा – पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण; 3 कोटी निधीची ‘ही’ कामे प्रगतीपथावर

महाराष्ट्रातील शासकीय नोकरभरतीला मराठा क्रांती मोर्चा चा विरोध; ‘आधी आरक्षण द्या, मग भरती करा’ अशी मागणी

नामनिर्देशक पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक : 25 आॕक्टोबर 2023 दुपारी 3 पर्यंत व त्याच दिवशी दुपारी 3 नंतर चिन्ह वाटप
आवश्यक असल्यास मतदान घेण्याचा दिनांक : 5 नोव्हेंबर 2023
मतमोजणी दिनांक : 6 नोव्हेंबर 2023

जेऊर, राजुरी, केम, रावगावं, चिखलठाण, गौंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केत्तूर, वीट, रामवाडी, घोटी, भगतवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे.

karmalamadhanews24: