आरोग्यजेऊर

जेऊर येथे कोरोना जनजागृती मार्गदर्शन अभियान रॅली संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर येथे कोरोना जनजागृती मार्गदर्शन अभियान रॅली संपन्न

जेऊर(प्रतिनिधी); आज दि.24 / 3 / 2021 रोजी स 9= 00ते दुपारी 2= 00 वा पर्यंत. जेऊर गावामध्ये कोविड 19 च्या संदर्भात लोक जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी करमाळा पंचायत समिती चे बालप्रकल्प अधिकारी माने साहेब, करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे साहेब, जेऊर केंद्राचे केंद्र प्रमुख कल्याण मंगवडे साहेब, ग्रामविकास अधिकारी यशवंत कुदळे , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. भोसले साहेब,सरपंच भारत(आण्णा) साळवे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमोडे, भारत हायस्कूलचे प्राचार्य केशव.दहिभाते सर,भारत प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर ,

जेऊर मधील सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस,सर्व आशा वर्कर्स, आरोग्य सेविका, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आणि सर्व टिमने संपूर्ण जेऊर गावामध्ये कोविड 19 च्या जनजागृतीचे कार्य मास्कचा वापर, साॅनिटायझर, सोशल डिस्टिंगचा वापर करून कोविड 19 ची काळजी घेणे बाबत जेऊर मधील सर्व दुकानदार,चहा पान टपरीवाले, हॉटेल्स,भाजी विक्रेते,मेडिकल स्टोअर्स यांना सकाळी 9=00ते दुपारी 12=00वा पर्यंत मार्गदर्शन केले.

हेही वाचा-लाखात तस्करी होणारे ‘मांडूळ’ करमाळयातील ‘या’ तरुणांनी आज जागतिक वन दिनी केले वन विभागाच्या हवाली

कोरोना महामारीला रोखण्यासाठी करमाळा आगाराने केली ‘ही’ खास उपाययोजना; वाचा सविस्तर

तर कोविड 19 चे नियम न पाळणा-या व्यक्तीकडून एकूण 6500 रूपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमा मध्ये ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले.

litsbros

Comment here