जेऊर-चिखलठाण रस्त्याची दुरावस्था, तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करू; शंभूराजे जगताप यांचा इशारा

जेऊर-चिखलठाण रस्त्याची दुरावस्था, तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करू; शंभूराजे जगताप यांचा इशारा

केत्तूर (प्रतिनिधी) – चिखलठाण रोडची दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. जेऊर ते चिखलठाण प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हा रस्ता प्रसिद्ध कोटलिंग देवस्थानाला जोडणारा असून या ठिकाणी असंख्य भक्तगण दर्शनासाठी येत असतात तसेच चिखलठाण परिसर मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक तसेच केळी उत्पादक म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे.

असे असतानाही शासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे चिकलठाण, शेटफळ, कुगाव आदी गावातील ग्रामस्थांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी दिला आहे .

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

मृग नक्षत्राच्या पाऊसाने करमाळ्याला झोडपले:१८४ मिलीमीटर पाऊसाची नोंद: बळीराजा वाफस्याच्या प्रतीक्षेत

यावेळी बोलताना ते म्हणाले हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी विलंब होतो आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी जाणे येण्यासाठी रुग्ण व गरोदर माता भगिनींना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेमध्ये मदत कार्य करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना सुद्धा या गोष्टींच्या सामना करावा लागला होता.

रस्ता दुरुस्तीच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहेत.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line