आरोग्यजेऊरसोलापूर जिल्हा

जेऊरच्या भारत महाविद्यालयामध्ये ‘या’ तारखांना होणार जम्बो कोविड लसीकरण शिबिर; लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊरच्या भारत महाविद्यालयामध्ये ‘या’ तारखांना होणार जम्बो कोविड लसीकरण शिबिर; लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा(प्रतिनिधी) ;
महाराष्ट्र शासनाच्या युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण मोहिमेअंतर्गत भारत महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्ष व प्राथमिक आरोग्य केंद्र,जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 27 ऑक्टोबर व गुरुवार दि. 28 ऑक्टोबर या दोन दिवशी जेऊर ता. करमाळा येथील भारत महाविद्यालयांमध्ये कोविड लसीकरणाच्या जम्बो शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी ‘करमाळा माढा न्यूज’ला दिली.

सदर शिबीर वरील दोन्ही दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार असून या लसीकरण शिबिरामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींचे डोस देण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी ज्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केलेली नाही अशा नागरिकांनाही या शिबिरामध्ये लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठी येताना नागरिकांनी जेवण किंवा नाश्ता करून येणे गरजेचे असून येताना स्वतःचे आधार कार्ड व मोबाईल सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

हेही वाचा – ऊस वाहतूकदारांच्या बाबतीत कारखानदारांना कधी फुटणार मायेचा पाझर ? ऊस वाहतूकदार सापडले कात्रीत

हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या; सहा महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

या लसीकरण मोहीममध्ये पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही डोससाठी लसीकरण करण्यात येणार असल्याने या लसीकरण शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.

litsbros

Comment here