करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त ‘करमाळा साहित्य मंच’ आयोजित काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; वाचा कोण आहेत विजेते कवी?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त करमाळा साहित्य मंच आयोजित काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; वाचा कोण आहेत विजेते कवी?

करमाळा माढा न्यूज: करमाळा साहित्य मंच यांच्या पुढाकाराने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक कवींनी उत्स्फूद प्रतिसाद नोंदवला होता. या मध्ये अनेक दर्जेदार कवितांचे संकलन झाले. यातील कवितांचे तटस्थ परिक्षमार्फत परीक्षण करून अनुक्रमे तीन क्रमांक देण्यात आले.

 

यात प्रथम क्रमांक ऋतुजा अरुण वीर (बदलता काळ),द्वितीय क्रमांक नंदकिशोर वलटे सर (आण्णाभाऊ साठे),तृतीय क्रमांक तेजस धेंडे(भारत घडवू) या कवितांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या कवींना अनुक्रमे हजार, सातशे, पाचशे रुपयांचे बक्षीस त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचे आयोजक खालील शेख यांनी सांगितले.

 

तसेच तालुक्यातील साहित्यिकांच्या प्रतिभेला साहित्य मंच च्या माध्यमातूत संधी देणे व आण्णा भाऊंच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हि स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे ग्रुप समनव्याक नवनाथ खरात सर, साहित्यिक प्रकाश तात्या लावंड यांनी माहिती दिली.

हेही वाचा- ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीसाठी ‘सातवी उत्तीर्णची अट’ विद्यमान सरपंच, सदस्य ही अपात्र

शेतकऱ्यांबद्दल खरच कळवळा असेल तर आदिनाथ व मकाईची देखील सीआयडी चौकशी होऊ द्या; बागलांच्या मागणीला जगतापांचा टोला

litsbros

Comment here