यंदा जांभूळ खाणे झाले दुर्मिळ; दरही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर

यंदा जांभूळ खाणे झाले दुर्मिळ; दरही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर 

केत्तूर,ता.20 यावर्षी सतत बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांच्या हंगामावर विपरीत परिणाम झाला असतानाच आंबा, जांभूळ या फळ उत्पादनाही मोठा फटका बसला आहे.ढगाळ हवामानामुळे मोहोर व फुलगळती झाल्याने फळधारणा कमी झाल्याने यंदा जांभूळ खाणे दुर्मिळ झाले आहे.त्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.

“जांभुळ पिकल्या झाडाखाली ” या प्रसिद्ध गाण्याचे शब्द कानावर पडले की, जिभेला पाणी सुटते. आंबट, गोड चव असणाऱ्या या जांभळाचे दर 220 ते 250 रुपये किलो पर्यंत गेले आहेत.पावसाळ्यात सर्वांच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या व वरचेवर दुर्मिळ होत असलेल्या जांभळाचे दर जास्त असूनही त्याला मागणी असल्याचे दिसून येत आहे.

जांभूळ हे दक्षिण आशिया तसेच आग्नेय आशिया मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते हा सदाहरित वृक्ष आहे. याची फळे उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात.

” मागील काही वर्षापासून होणाऱ्या वृक्षतोडीमुळे गुणकारी जांभळाची झाडे ही तोडली गेला आहेत त्यामुळे नुकसान झाले आहे. यापुढे आरोग्यासाठी व शेताच्या बांधावर जांभळांच्या बियाणे रोपण गरजेचे महत्त्वाचे आहे. वृक्षसंपदेबरोबरच उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहिल्यास निश्चितच वनसंपदा बहरेल.
– काकासाहेब काकडे,वृक्षप्रेमी, वीट (करमाळा)

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; एक महिन्यानंतर सर्व विभागांचा आढावा मला द्या; आ. संजयमामा शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना

जांभळाचे आरोग्यदायी फायदे

मधुमेह रक्तदाब यासारख्या अनेक आजारावर जांभळ हे फळ फायदेशीर समजले जाते. तसेच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी हे . उपयोगी आहे. त्वचेच्या आजारावर जांभळाचा ज्यूस फायदेशीर ठरतो तर जांभळात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्याने हृदयविकारासाठी जांभूळ फायदेशीर ठरते.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line