जैन साधू आचार्य श्री 108 काम कुमार नंदी यांच्या हत्येची चौकशी व कडक कारवाई ची मागणी; करमाळा तहसिलदारांना निवेदन

जैन साधू आचार्य श्री 108 काम कुमार नंदी यांच्या हत्येची चौकशी व कडक कारवाई ची मागणी; करमाळा तहसिलदारांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी);
कर्नाटक राज्यामध्ये जैन साधू आचार्य श्री 108 कामकुमारनंदी यांची अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींची कसुन चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी करमाळा येथील सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

तहसीलदार श्री विजयकुमार जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर कुंजिर यांना याबाबत निवेदन दिले आहे.

यावेळी मनोज गांधी, प्रदीप बलदोटा, सुशील कटारिया , निलेश कटारिया, गोटु कटारिया, रितेश कटारिया, अशोक छगनलाल दोशी, प्रितम दोशी, अशोक नेमचंद दोशी, अनुप दोशी, आकाश गांधी , मयूर दोशी, अभिजित दोशी, राजेश कटारिया, मंगेश गांधी, सुरज दोशी,स्वप्नील दोशी,दिपक कटारिया, रितेश कटारिया आदि जैन बाधंव उपस्थित होते.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात बेळगाव मधील चिकोडी जवळ हिरेकोंडी येथे जैन साधू आचार्य श्री 108 कामकुमारनंदी यांचे 5 जुलै रोजी अज्ञात लोकांनी आज्ञास्थळी अपहरण करून नेले होते. त्यानंतर सात जुलै रोजी सकाळी त्यांची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती . याबाबत संपूर्ण देशातील सकल जैन समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यासंदर्भात हत्या करण्याच्या आरोपावरून दोन संशयित गुन्हेगारांना कर्नाटक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या दोघांनी आचार्य कामकुमारनंदी यांची हत्या का केली याचे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. त्यांची निर्घुण पणे हत्या करणाऱ्याला कठोर सजा द्यायला हवी.

सध्या देशामध्ये जैन साधुसंत सुरक्षित नाहीत हे यावरून सिद्ध झालेले आहे. सातत्याने जैन साधू व साध्वी यांच्यावर सतत हल्ले केले जात आहे. हत्याही होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना व विकृत प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसणे आवश्यक आहे.

हेही वाचा – कृष्णा खो-यातून 51टीमसी पाणी उजनीत सोडण्याच्या प्रकल्पास शासनाची तत्वतः मंजुरी – आमदार बबनराव यांनी

साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारांनी कडक पावले उचलायला हवी जेणेकरून गुन्हा करणा-याला धडकी भरली पाहिजे. असे या निवेदनातून म्हटले आहे.

जैन समाजातील कार्यकर्त्यांनी या निवेदनाचे प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, गृहमंत्री आदिना दिल्या आहेत. या निवेदनावर शेकडो जैन बांधवांच्या सह्या आहेत.

karmalamadhanews24: