करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदीशब्द फाउंडेशन’चा आधार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कोरोनाने कुटुंबप्रमुख गेलेल्या शेटफळ येथील कुटुंबाला ‘जगदिशब्द फाउंडेशन’ने दिला आधार

करमाळा(प्रतिनिधी) ; ज्या ड्रायव्हर तरुणाने कोरोना काळात गावातील दीडशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांना स्वतःच्या गाडीतून दवाखान्यापर्यंत पोहचवले व सर्वांना मदत केली पण शेवटी कोरोनाने त्यालाच गाठले असे करमाळा तालुक्यातील शेटफळ या गावातील सोमनाथ भय्या माने यांचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. सारा गाव आणि मित्र परिवार झटला पण प्रयत्न असफल झाले आणि सोमनाथ गेला.

पण मागे पत्नी आणि चिमुकली दोन मुले आणि एक मुलगी.. हा संसार आता उघड्यावर आला. त्यात अजून वेदनादायक बाब म्हणजे त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शिवरुद्र(१ ली) हा कर्णबधिर व गतिमंद आहे. शेती नाही की कोणता उत्पन्न स्रोत नाही. मजुरी करून ती स्त्री कशी घर चालवणार.? मुलांची शिक्षण कशी करणार.?

त्या परिवारासह व्याख्याते जगदीश ओहोळ, साहित्यिक गजेंद्र पोळ, नवनाथ धांडोरे व इतर

त्यांची माहिती जगदिशब्द फाउंडेशन चे संस्थापक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांना समजली आणि फाउंडेशन ने या चिमुकल्या शिवरुद्र, स्वरांजली व ओंकार या तिन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

जगदीश ओहोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी माने यांच्या घरी भेट दिली त्यांना मानसिक आधार दिला, त्यांचे सांत्वन केले. कुटुंबासाठी दिवाळी करिता किराणा सामान दिले.

तसेच आता शाळा सुरू झाल्या आहेत तर त्यांच्या मुलांना सर्व दर्जेदार शैक्षणिक साहित्य दिले. व पुढील काळात ही सर्व शैक्षणिक साहित्य व मदत देऊ असे सांगितले आणि त्या चिमुकल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व साहित्यिक गजेंद्र पोळ, जिव्हाळा ग्रुपचे इतर प्रशांत नाईकनवरे, सुहास लबडे विजय पोळ, जुनी पेंशन हक्क संघटनेचे संस्थापक सोलापूर जिल्हा अध्यक्ष, शिक्षक नेते नवनाथ धांडोरे आदीजन उपस्थित होते.

litsbros

Comment here