जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे पुणे येथे श्रीमंत कोकाटे, किरण माने यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; वाचा सविस्तर!

जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे पुणे येथे श्रीमंत कोकाटे, किरण माने यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; वाचा सविस्तर!

करमाळा(प्रतिनिधी); शून्यातून विश्व निर्माण करण्याची व कोणत्याही संकटात खचून न जाता लढण्याची ताकद आणि प्रेरणा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पुणे येथे बोलताना केले.

करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे लेखक व व्याख्याते जगदीश अशोक ओहोळ यांनी लिहोलेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित असणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे सावित्रीबाई फुले सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपादक व पत्रकार अभिजीत कांबळे, समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे इतिहास संशोधक, वक्ते श्रीमंत कोकाटे व अभिनेते किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मनोगत व्यक्त करताना इतिहास संशोधक डॉ श्रीमंत कोकाटे

यावेळी बोलताना समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे म्हणाले की, ‘माझ्यासारखा एक मिल कामगाराचा नातू व कष्टकऱ्याचा मुलगा आज समाज कल्याण सहाय्यक आयुक्त झाला आहे, हे केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच! अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोट्यावधी लोकांचे जग बदललेले आहे व आज ते लोक एका नव्या आधुनिक जगामध्ये जगत आहेत.
हे कोट्यावधी लोकांचे जग बदलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगदीश ओहोळ यांनी या पुस्तकातून मांडले आहेत, ते आजच्या पिढीतील प्रत्येक तरुणाने वाचले पाहिजेत.

अभिनेते किरण माने यांचा सन्मान करताना लेखक जगदिश ओहोळ

तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत. ते ग्लोबल बाबासाहेब आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत. ते ग्लोबल बाबासाहेब सांगण्याचे काम लेखक जगदीश ओहोळ यांनी या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकातून केले आहे, असे प्रतिपादन संपादक अभिजीत कांबळे यांनी केले.

‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक चाळताना समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे साहेब

या पुस्तकात मांडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र हे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही तर सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हे सांगण्यात हे पुस्तक यशस्वी झाले आहे, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर राऊत गंगासेन वाघमारे यांनी केले, तर आभार परिवर्तन चे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी मानले.

हेही वाचा – ३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

चार फेब्रुवारीला होणार करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

पुस्तकं विकत घेऊन वाचा; श्रीमंत कोकाटे

पुस्तक विकत घेऊन वाचा हे, बहुजन समाजाला सांगावे लागत नाही. परंतु पुस्तक विकत घ्या आणि ती नेऊन नुसती ठेवू नका, तर ती वाचा आपल्या मुलांना वाचायला सांगा. जी माणसं पुस्तकं वाचतात, त्यांचं मस्तक सुधारतं आणि मग ती चुकीच्या माणसा पुढे नतमस्तक होत नाहीत. असेच प्रत्येकाने वाचावं असं हे जगदीश ओहोळ यांनी लिहिलेलं ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक आहे. ते पुस्तक प्रत्येकाने घ्या आणि वाचा असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी केले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line