सर्वांना लागले गुढीपाडव्याचे वेध; साखरगाठ्यांचे दर स्थिर असल्याने दिलासा

सर्वांना लागले गुढीपाडव्याचे वेध; साखरगाठ्यांचे दर स्थिर असल्याने दिलासा

केत्तूर (अभय माने) होळी सणानंतर खऱ्या अर्थाने वेध लागते ते गुढीपाडवा सणाचे मराठी नववर्ष दिनाचे अर्थात गुढीपाडव्याचे. 

गुढीपाडव्याला यावर्षी साखरगाठ्यांचे दर मात्र स्थिर असल्याने नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. साखरगाठीचे दर गतवर्षी होते तेवढेच म्हणजे 80 रुपये किलो असे आहेत. 

साखरेच्या दरात वाढ न झाल्याने साखरगाठ्यांचे दर स्थिर राहिले आहेत. इतर इतर सर्व ठिकाणी महागाई वाढत असताना साखरगाठी मात्र महागल्या नाहीत. 

परिसरात किराणा दुकानात गुजरातहून साखरगाठी येतात स्थानिक साखरगाठी मात्र 100 रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत.

karmalamadhanews24: