शेंगदाणा दरात प्रचंड वाढ; सर्वसामान्यांची भाजी झाली बेचव
केत्तूर (अभय माने) : भुईमूग उत्पादक राज्यात हवामानातील बदल,जास्तकाळ रेंगाळलेला पाऊस आदि विविध कारणामुळे भुईमूग लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेली घट तर सध्या हंगामाचा अखेरचा टप्पा सुरू झाल्याने तसेच गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पुरवठा कमी झाल्याने दिवाळीपूर्वी 100 रुपये किलोच्या आसपास चांगल्या शेंगदाण्याचा दर आता मात्र जानेवारीमध्ये शंभरी पार (130 रुपये प्रति किलो) पर्यंत गेला आहे.
चांगल्या प्रतीच्या शेंगदाणा दराने उच्चंकी पातळी म्हणजेच पाचशे रुपयांनी दरवाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या भाजीची चव मात्र पार बिघडून गेली आहे.
घरच्या जेवणातील भाजीसाठी नेहमी लागणान्या शेंगदाण्याचे दर वाढले असले तरी मागणी मात्र कायम आहे खाद्यपदार्थ तसेच शेंगदाणा तेलाचा वापर वाढला आहे त्यामुळे शेंगदाण्याची दर वाढले आहेत.
आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून लवकरच भुईमुगाची आवक सुरू होईल परंतु, जास्त शेंगदाणे ते दक्षिण भारतात पाठवतात त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत आवक होत नाही तोपर्यंत शेंगदाण्याचे दर असेच चढे राहतील असे किराणा व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितले.
शेंगदाण्याबरोबरच ज्वारी, गहूं, बाजरी, तांदूळ, डाळी यांचे दर ही वरचेवर वाढतच आहेत त्यामुळे या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ बसली आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांने जगावे तरी कसे हाच प्रश्न निर्माण झाला आहे महागाई कमी करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
Comment here