पितृपंधरवडा व पावसामुळे भाज्यांचे दर वाढले: क्लिक करून वाचा आजचे बाजारभाव
केत्तूर (अभय माने ) गणेशोत्सव संपल्यानंतर पितृपंधरवडा सुरू झाला आहे त्यामुळे भाज्यांचे दर कमी होतील अशी ग्राहकांना आशा असतानाच बाजारात भाज्यांचा पुरवठा कमी अन् मागणी जास्त असल्याने त्याचा फटका दरवाढीवर झाला आहे.
त्यातच गणेशोत्सव काळात झालेला जोरदार पाऊस व त्यानंतर रोजच होणारा रिमझिम पाऊस भाजीपाला पिकासाठी मारक ठरला आहे.
बहुतांश ठिकाणी भाजीपाला वाहून गेला तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने तो सडून गेला.पितृपंधरवाड्यात पूर्वजांच्या स्मरणार्थ नातेवाईकांना आपल्या घरी जेवणासाठी बोलवण्याची परंपरा आहे.
यावेळी गवार, काकडी, गोसावळा, भेंडी, कारले, शेवगा, पाणी यांना विशेष महत्त्व असते त्यामुळे या भाज्या खरेदीसाठी नागरिकांची पसंती आहे मात्र वरचेवर या भाज्यांची दर वाढतच आहेत.
सद्यस्थितीत भाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत कमी झालेले कोथिंबीरीची दही भरमसाठ वाढल्याने जेवणाची चवही अळणी होऊ लागली आहे.
भाजीपाला बाजारात सध्याची भाज्यांचे दर पुढील प्रमाणे
मेथी – 25 ते 30, कांदा – 20 ते 30, लसुन- 25 ते 30,
गवार- 80 ते 85, दोडका- 55 ते 60, बटाटा- 20 ते 30 ,
भेंडी- 65 ते 70, टोमॅटो-35 ते 40, हिरवी मिरची – 55 ते 60
काकडी-50 ते 55, कारले-30 ते 40, अळूची पाने- 20 रु.4,
शेवगा-30 रु 5, कोथिंबीर-20 ते 25, घेवडा-60 ते 70 .
Comment here