निरज चोप्राने केलं भारताचं सोनेरी स्वप्न पूर्ण;जिंकले पहिले सुवर्णपदक
टोकियो ऑलिम्पिकचा अखरेचा दिवस भारतासाठी सोनेरी ठरला आहे. 2021 साली ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.नीरज चोप्रामुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षाचा दुष्काळ संपला आहे.
नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली.दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि अखेर सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.
हेही वाचा-करमाळयाच्या सुपुत्राच्या ‘या’ चित्रपटाचं जगभरात कौतुक; ५७ पुरस्कारांसह ११ देशात गवगवा
‘शेंगदाण्यापासून तेल काढणे’ बनू शकतो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय; वाचा सविस्तर..
ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावलं होतं.
दरम्यान, भारताला आज दोन पदक मिळातीत यामध्ये बजरंग पुनियाने कांस्य तर नीरजने सुवर्ण. भारताच्या खात्यात एकूण सात पदके आली आहेत.
Comment here