ग्रामीण भागात पहिल्यांदाच श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये एन.एन.एस. या नवीन युनीटचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

ग्रामीण भागात पहिल्यांदाच श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये एन.एन.एस. या नवीन युनीटचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी – श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना या नवीन युनीट लचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उद्घाटक म्हणून मराठवाडा विभागप्रमुख व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रथम शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर प्रमुख उद्घाटक प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख जिल्हा समन्वयक प्रा लक्ष्मण राख, प्राचार्य श्री सुभाष कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाधक्ष श्री गणेशवस्ताद तळेकर, श्री सागरराजे तळेकर, यांच्या हस्ते फीत कापून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नवीन युनीटचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उद्घाटक प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी या ज्युनियर कॉलेजच्या नवनवीन उपक्रमाचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजना या नवीन युनीटचे त्यांनी केम परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यात होणारे फायदे सांगितले. जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत केम परिसरातील ग्रामीण भागातील, वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचा घडून येणारा व्यक्तिमत्व विकास याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली.

हेही वाचा – श्री नंदिकेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सवाद्य मिरवणूक

कामे न करता फक्त पैसा व मनोरंजनाच्या जोरावर आमदार होता येते हा विरोधकांचा गैरसमज – आ. बबनदादा शिंदे वडाचीवाडी (अं.उ) येथे शेतकरी मेळावा व वचनपूर्ती सोहळा संपन्न

या कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष श्री गणेशवस्ताद तळेकर, श्री राहुल रामदासी, श्री सागरराजे तळेकर, प्रा. पी.एन.दापके, मा.प्राचार्य श्री दिलावर मुलानी, प्रा.अमोल तळेकर, श्री बापूराव सांगवे, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शालेय समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील हे एकमेव राष्ट्रीय सेवा योजनेचे नवीन युनीट केम मध्ये आल्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. या नवीन उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

karmalamadhanews24: