करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

आय.सी.एल इंडिया द्वारा कंदर येथील ‘हे’ केळी बागायतदार ‘प्रयोगशील किसान श्री’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आय.सी.एल इंडिया द्वारा कंदर येथील ‘हे’ केळी बागायतदार ‘प्रयोगशील किसान श्री’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा (प्रतिनिधी) ;
कृषी क्षेत्रातील भारतातून दहा निवड शेतकऱ्यांची आय सी एल कंपनीकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात करण्यात आली होती. त्यानुसार नुकताच कंदर ता.करमाळा येथील प्रगतशील युवा शेतकरी अभिजित भांगे यांना किसान श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पाँलिसल्फेट मान्सून धमाका शेतकऱ्यांसाठी संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आला होता.

जगविख्यात खते उत्पादन करणारी इज्रायल स्थित बहुराष्ट्रीय कंपनीने शेतकऱ्यांना फर्टिगेशन व ठिबक सिंचन अशा प्रगत व अत्याधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला व मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार देशभरातून निवड शेतकऱ्यांचा किसान श्री सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री संजय बिरादार यांनी कंपनीद्वारे सुरवात करण्यात आलेल्या ” किसान श्री ” या उपक्रमाबद्दल माहिती दिली.

ज्या शेतकरी बांधवांनी शेतीत , शेती विकास व उद्यमिता याबाबतीत अभूतपूर्व कामगिरी केली आहे, अशा शेतकरी बांधवांना आय सी एल इंडिया द्वारा सन्मानित करण्यात येते.अशी माहिती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिली.

“किसान श्री” या पुरस्काराचे पाहिले मानकरी कंदर ता.करमाळा येथील प्रयोगशील ,प्रगतशील शेतकरी अभिजित भांगे यांना देण्यात आले.

पुरस्कार स्वीकारताना अभिजित भांगे यांनी आय सी एल इंडिया च्या या उपक्रमाचे कौतुक करून या उपक्रमामध्ये जिल्हातील इतर शेतकऱ्यांना अव्वाहन केले.

या कार्यक्रमास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वप्नील धोखा,विपिन दोशी ,शैलैश वेदपाठक यांनी सहकार्य केले.

हेही वाचा – जनशक्ती शेतकरी संघटनेने पुकारलेल्या ऊस वाहतुकीच्या संपाला ‘या’ नेत्याचा पाठिंबा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 60 कोटींचा निधी द्या- सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची मागणी

यावेळी कंदरचे नवनाथ भांगे, शिवशंकर माने,उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, उद्योजक सुहास कदम,नानासाहेब लोकरे,महेंद्र लोकरे, उद्योजक संभाजी लोंढे, शेतकरी दादासाहेब पाटील, बापू गोडसे,दादा कामटे, उमेश बनसोडे कंदर तलाठी, स्वप्नील धोखा, विपिन दोशी, शैलैश वेदपाठक डेप्यूटी स्टेट मँनेजर,संजय बिरादार सिनियर एँग्रोनाँमिस्ट आय.सि.एल इंडिया, राकेश पाटील स्टेट मँनेजर महाराष्ट्र, प्रशांत जोशी फील्ड एँग्रोनाँमिस्ट, आय,सी. एल , वैभव तांबारे फील्ड एँग्रोनाँमिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते.

कंदर येथील केळी बागायतदार भांगे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे कंदर तसेच परिसरातील याशिवाय करमाळा तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here