क्राइमपुणेसोलापूर जिल्हा

पाणीपुरी का आणली.? म्हणून नवराबायकोत वाद; बायकोची आत्महत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाणीपुरी का आणली.? म्हणून नवराबायकोत वाद; बायकोची आत्महत्या

पुणे: सध्याच्या काळात वाद व्हायला आणि आत्महत्या करायला लोकांना छोटीछोटी कारण ही पुरेशी ठरू लागली आहेत, असे दिसून येत आहे. मला न विचारता पाणीपुरी का आणली.? असे म्हणत पती – पत्नीमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्यानं पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रतीक्षा सरवदे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती गहिनीनाथ सरवदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. 

गहिनीनाथ सरवदे मूळचे सोलापूरचे रहिवासी आहेत. २०१९ मध्ये त्यांचा विवाह प्रतीक्षा यांच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांच्यात वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ यांनी प्रतीक्षा यांना पुण्यात आणलं होतं. ते दोघे आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास होते.

दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी ऑफिसवरून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मला विचारता पाणीपुरी का आणली, असा सवाल करत प्रतीक्षा यांनी त्यावेळी केला. यातून दोघांमध्ये वाद झाला. प्रतीक्षा यांनी पाणीपुरी खाण्यास नकार दिला.

हेही वाचा- करमाळा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त

करमाळयातील ‘या’ दोन महिला अधिकाऱ्यांची बदली झाल्याबद्दल विशेष सत्कार संपन्न; या गुणवंत विद्यार्थ्यांचा ही आला सन्मान

त्यानंतर प्रतीक्षा यांनी गहिनीनाथ कामावर जाताना त्यांना डबा नेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रतीक्षा यांनी विषारी औषध प्राशन केलं. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास प्रतीक्षा यांची मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज संपली. त्यानंतर प्रतीक्षा यांचे वडील प्रकाश पिसेंनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गहिनीनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

यानंतर पोलिसांनी गहिनीनाथ यांना अटक केली. सध्या पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

litsbros

Comment here