महाराष्ट्रशैक्षणिक

Breaking | यंदा १२ वीचा एकूण निकाल ९९.६३ टक्के

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

Breaking – यंदा १२ वीचा एकूण निकाल ९९.६३ टक्के

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कोरोनाकाळात परीक्षेविना जाहीर झाला असून HSC चा ऐतिहासिक निकाल 99.63 टक्के लागला आहे. तो आज ३ ऑगस्ट दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. करोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य मंडळाला पालन करता आले नाही.

बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शाखेनिहाय असा लागला निकाल

विज्ञान शाखा – ९९.४५ टक्केकला शाखा – ९९.८३ टक्केवाणिज्य शाखा – ९९.९१ टक्केउच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – ९८.८० टक्के

असे असणार निकालाचे सूत्र
बारावीचा निकाल जाहीर करताना ३०+३०+४० असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांतील गुणांच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० टक्के गुण देण्यात येतील. तर बारावीच्या वर्षांत शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक यांच्याआधारे ४० टक्के गुण देण्यात येणार आहेत.

विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता
येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
१. https://hscresult.11thadmission.org.in
२. https://msbshse.co.in
३. hscresult.mkcl.org
४. mahresult.nic.in.
५. https://lokmat.news18.com
www.mahresult.nic.in a https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या
निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

12th Result साठी लागणार सीट नंबर…कसा मिळवायचा बैठक क्रमांक
दरवर्षी बोर्डाच्या परीक्षांसाठी ठराविक बैठक क्रमांक परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांना दिला जातो. Hall तिकिटावर तो असतो. यंदा परीक्षाच झाली नसल्याने विद्यार्थ्यांना आधी त्यांचा बैठक क्रमांक जाणून घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांना निकाल पाहता येईल.

तुम्हाला माहीत नसेल बैठक क्रमांक तर http://mh-hsc.ac.in/ इथे सर्च करा…

संपूर्ण नाव, आईचं नाव आणि तालुका, जिल्हा असे डिटेल्स भरल्यावर तुमचा परीक्षा बैठक क्रमांक येईल.

litsbros

Comment here