हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

हिसरे येथील शेतकऱ्याच्या लेकीचे यश; भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत निवड

करमाळा (प्रतिनिधी- अलीम शेख); भारत सरकार आयोजित केंद्रीय कार्यालय दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी चयन आयोग 2023 च्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट ऑडिट ऑफिसर सहाय्यक वित्त व लेखा अधिकारी परीक्षेत हिसरे तालुका करमाळा येथील एका शेतकरी कुटुंबातील कन्या कुमारी जस्मिन झहीर शेख या विद्यार्थिनीने यश मिळवले आहे तिने सन 2023 मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (एस. एस. सी) दिल्ली च्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट ऑडिट ऑफिसर अर्थात सहाय्यक वित्त व लेखा अधिकारी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे तिने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मिळवली आहे

कुमारी जस्मिन शेख मूळची हिसरे येथील शेख कुटुंबातील रेशन दुकानदार जहीर अब्दुल गनी शेख यांची कन्या तर माजी सरपंच कैलासवाशी अब्दुल गणी इमाम यांची ती नात असून तिचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा हिसरे तर माध्यमिक शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात याशिवाय महाविद्यालयीन इंजीनियरिंग शिक्षण पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये झाले आहे कुमारी जस्मिन शेख हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कोणत्याही पद्धतीचे क्लास न लावता अहोरात्र अभ्यास करून सदरचे यश मिळवले असल्याचे कुमारी जस्मिन शेख हिने बोलताना सांगितले.

हेही वाचा – दहीगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन आजपासून सुरु.,,,,, आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

उजनीच्या पाण्याचे पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून उत्साहात पूजन

कुमारी जस्मिन शेख हिने अल्पसंख्यांक समाजात प्रथमताच स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा दिल्याने व त्यामध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून विशेषता मुस्लिम समाज बांधवांमधून विशेष अभिनंदन होत आहे तिच्या या यशात ती आई वडील यांना विशेष स्थान देत आहे

karmalamadhanews24: